•  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

1504869454199

*कोरोना कोविड 19 च्या काळात तंत्रज्ञान व डिजिटल माध्यम चा वापर करून केली जात आहे शेती*

पूर्वी शेतातील पिकाची काढणी करून त्यावर बैलाद्वारे मळणी करुन धान्य तयार करून घरी आणले जायचे. पण आता या सर्व जुन्या पद्धती बंद झाल्या असून, कमी वेळात अधिक काम करीत नवनव्या आधुनिक यंत्राचा वापर करून शेती केल्या जात आहे.

शेतातील नांगरणी पासून ते पीक घरी येईपर्यंत नवीन तंत्रज्ञान व नवनवीन यंत्राचा वापर करून शेती करतांना प्रत्येक शेतकरी दिसतो. त्यामुळे जुन्या पद्धतीने शेती करण्याची पद्धत जवळपास इतिहास जमा झाली आहे. नांगरणी, वखरणे, पेरणी, फवारणी, निंदनाऐवजी तणनाशक फवारणी, दांडाऐवजी ठिबक अथवा स्प्रिंकलर ने पाणी देणे.

Courtesy- https://magarticles.magzter.com

यासह थ्रेशरद्वारे पीक काढणे व पोते भरून घरी ट्रॅक्टरद्वारे आणणे अन्यथा मार्केटमध्ये नेणे. ह्या सगळ्या गोष्टी यंत्राच्या साहाय्याने होत आहेत, खर्च वाढला, निसर्गाने साथ दिली तर पीक चांगले अन्यथा नुकसान किंवा लागवडीच्या खर्चाची बरोबरी होते.

पूर्वी पीक हाताने काढून त्याची बैलद्वारे मळणी केल्या जात होती. आता मळणी यंत्राद्वारे धान्य काढून घरी आणल्या जाते. आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाने आधुनिक यंत्राचा वापर करीत शेतकरी कुठेही मागे पडत नाही. पूर्वी प्रत्येक शेतकर्‍याकडे सर्जा राजाची जोडी राहायची ती जोडी आता कमी झाली असून, त्याची जागा आधुनिक तंत्रज्ञानाच्या ट्रॅक्टरने घेतली.

पूर्वी सर्जा राजाच्या जोडीद्वारे संपुर्ण शेती केली जायची आता ट्रॅक्टरच्या युगात कमी गडी माणसावर कामे व्हायला लागलीत.
पुर्वी प्रत्येक शेतकर्‍याकडे चार-चार बैलजोड्या राहत असून त्या बैलजोड्या सांभाळण्यासाठी सालगडी ठेवावा लागत असे परंतु कालांतराने बैल जोड्या कमी होते चालल्या असून सालगडी कमी झालेत. पूर्वी शेतकर्‍यांनी अप्रतिम ज्वारी, बाजरी, मका आदि पिके काढणे झाल्यानंतर त्या पिकाची मळणी केली जायची ही मळणी साधारण आठवडा भर चालायची.

तेव्हा शेतकरी मोठ्या अभिमानाने आजूबाजूच्या शेतकर्‍यांना जेवण्यासाठी बोलवत असत, त्याला खळपुंजी असे म्हटले जायचे, आता मात्र खळपुंजी नाही आणि मळणी नाही. यामुळे शेतात जेवनाची प्रथा ही बंद होत चालली आहे. आता प्रत्येकाकडे वेळेची कमतरता आहे, गडी माणसांची कमतरता आहे तेव्हा या आधुनिक यंत्राला आत्मसात करून शेतकरी शेती करत आहे. यंत्रामुळे सगळे कामे वेगाने होत आहेत, मात्र खर्चात वाढ झाल्याने मालाच्या उत्पन्नाच्या प्रमाणात शेती परवडणारी होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकर्‍याकडून ऐकायला मिळतात.

पूर्वीच्या काळात केली जाणारी शेती ही इतिहास जमा होऊ लागली. आता तंत्रज्ञान व आधुनिक यंत्र समुग्रीचा आणि या सद्यस्थितीमध्ये कोरोना कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शेतकरी ऑनलाइन पद्धतीचा वापर करून तसेच डिजिटल समाज माध्यमाचा वापर करूनच छोटा मोठा शेतकरी शेती करीत आहे या लोकडाऊन च्या काळात शेतमाल व फळपिके थेट शेतकरी आणि ग्राहक ही नवी साखळी निमार्ण होत आहे


यात अडते, दलाल, इत्यादी कडी विस्कटून जाऊन शेतकरी ते कपंनी
कच्चा माल व्यवहार सुरू झाला तर

कंपनी ते शेतकरी
निविष्ठा पुरवठा होत आहे.
त्या मुळे शेतकरी थोडं का होईना समाधानी आहे.

टीम किनवट
कृ स निलकंठवार
ता कृ अ कार्यालय किनवट

  •  
  •  
  •  
  •  
Sharad Nilkanthwar

By Sharad

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.