•  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

वर्णन –
वेखंड हे पाणथळ जमिनीत वाढणारे झुडूप असून, या वनस्पतीची पाने दोन- चार सें.मी. रुंद भाल्यासारखी असतात.

पाने गडद हिरवी असून, कंदाचा रंग तपकिरी व आतून पांढरा असतो. खोड बोटाइतके जाड, १.८-२.५ सेंमी. व्यासाचे, मांसल व सरपटत जमिनीत वाढणारे, तपकिरी रंगाचे, सुगंधी व शाखायुक्त असते.

गोल कणिसातील कणिशकास छदकणिश म्हणतात, फळे पिवळसर रंगाची असतात.

हे झाड भारतात समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंचीच्या, मुख्यत: ओलसर व दलदलीच्या जागी सापडते किंवा हिमालयाच्या आग्नेय, ओलसर भागात सापडते. कर्नाटकात व भारताच्या इतर भागात याची लागवड करतात.

वेखंड उपयोग –


बाजारात वेखंड या नावाने या वनस्पतीच्या खोडाचे सुके तुकडे मिळतात. त्यांचे चूर्ण औषधी व सुगंधी असते. त्याला काहीशी कडू व तिखट चव असते.

भूक लागत नसल्यास वेखंडाची पूड मधातून देतात. वेदना व सूज कमी करणे, डोकेदुखीवर उत्तम. कफ व खोकला, पोटांचे फुगणे, श्वासनलिकादाह (घशातील खवखव) इत्यादींवर व मुलांना आमांशा विकारांवर गुणकारी आहे.

वेखंडामुळे घशातील ग्रंथी वाहतात तसेच ते दम्यावर गुणकारी आहे. वेखंड मोठया प्रमाणात घेतल्यास ते वांतीकारक म्हणून काम करते आणि मोठ्या प्रमाणावर वांत्या होतात.

पाने आणि मूलस्तंभ सुगंधी पदार्थात, पेयात आणि कीटकनाशके तयार करण्यात वापरतात. मूलस्तंभातील तेल मज्जासंस्थेस उत्तेजित करणारे आहे.

वेखंडाच्या मुळांची भुकटी कृमीउत्सर्जक असते. ते आकडीरोधक व तंत्रिका (मज्जा) शक्तिवर्धक आहे. ते मानसिक विकृतींवरही उपयुक्त आहे.

स्त्रियांना प्रसूतिसमयी वेणांचा जोर वाढविण्यास केशर व पिंपळी मुळाबरोबर वेखंड देतात; बाळंतपणातही देतात. अंगदुखी व सर्दी यांवर वेखंड चूर्ण अंगास चोळतात व पोटातही देतात.

वेखंडाची पावडर तांदळात मिसळल्यास तांदळात कीड होत नाही. वेखंड हे बुद्धीवर्धक म्हणूनही एरव्ही उपयोगी पडते. वेखंडाला आयुर्वेदाने वेचा म्हटले आहे. याचे तेल नाकात टाकण्यसाठी (नस्य म्हणून) उपयोगी पडते. वेखंडाचे हे औषधी वैद्यकीय सल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी उपयोगात आणावे

  •  
  •  
  •  
  •  
One thought on “वेखंड”

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.