3 like 0 dislike
6k views
in Fruit crops by (5.2k points)

1 Answer

1 like 0 dislike
 
Best answer

रफ्तार -कृषी उद्यमिता विकास केंद्र (R-ABI)

भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत कृषिउद्यमिता  विकास हाती घेण्यात आला आहे. ह्यापैकी केंद्रीय कापुस प्रौदयागिकी अनुसंधान संस्था , माटुंगा , मुंबई येथे  रफ्तार -कृषी उद्यमिता विकास केंद्र (R-ABI) सुरु करण्यात आले आहे. ह्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रामधील विविध कल्पना / पूर्व - बीज स्टेज व कृषिउद्यमिता स्टार्टअपसाठी ८५% पर्यंत भांडवल देण्यात येणार आहे. कृषी व संलग्न क्षेत्रातील नवीन कल्पना स्टार्टअपसाठी कापुस प्रौदयागिकी अनुसंधान संस्था , माटुंगा , मुंबई येथील रफ्तार -कृषी उद्यमिता विकास केंद्र (R-ABI)  मध्ये २ महिने कृषी उद्यमिता अभिमुखता (ओरीएंटेशन ) कार्यक्रमात सहभागी होऊन त्यावर काम करावे लागेल. सहभागी व्यक्तीला दोन महिन्यांसाठी प्रति महिना  रु १० हजार स्टायपेंड (शिष्यवृत्ती) देण्यात येईल. ह्यादरम्यान  स्टार्टअप म्हणून नोंदणी करावी लागेल. दोन महिन्यानंतर सादरीकरणावर आधारित २० नावीन्यपूर्ण कल्पनांसाठी रु. ५ लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल. ह्या व्यतिरिक्त  २० स्टार्टअप प्रस्तावांना रु २५ लाखांपर्यंत बीज अनुदान देण्यात येईल. आवाहन करण्यात येत आहे की ज्या व्यक्तींना कृषी व संलग्न घटक क्षेत्रामधे  कृषी उद्यमि / उद्योजक बनायचे असेल तर त्यांनी प्रस्ताव खालील पत्यावर  सादर करावे.

CEO, R-ABI, ICAR-CIRCOT, Adenwala Road, Matunga, MUMBAI – 400019. Ph. 022-24143718

Email- circotrabi@gmail.com

अधिक माहितीसाठी मार्गदर्शक सूचना पहा- मार्गदर्शक सूचना RKVY-RAFTAAR

अधिक माहिती साठी लिंक 

http://msaau.org/?p=819 

by
selected by
...