2 like 0 dislike
74 views
in कांदा by (160 points)

1 Answer

0 like 0 dislike

वाढलेला दर सापडावा म्हणून, कांदा लवकर वाढावा व पोसावा म्हणून रासायनिक खताचा जादा वापर करू नये. त्यामुळे कांदा सडतो. करपा, ताक्या, पर्पल ब्लॉच (Purple Blotch) हे रोग येतात. नुसता युरिया, अमोनियम सल्फेट, कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट देऊ नये. कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खत देणे खूप महत्वाचे आहे. पिकाचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी 25 ते 30 टन प्रती हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे साठवण क्षमता वाढते त्यासाठी जास्तीत जास्त शेणखताचा किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे.

त्याकरिता प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद  व 50 किलो पालाश द्यावे. 1/3 नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले नत्र दोन हफ्त्यात लागवडीनंतर 30 व 45-50 दिवसात विभागून द्यावे. कांदा पिकास नत्र शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त व लागवडीच्या 60 दिवसानंतर दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते मानी जाड होतात. कंद आकाराने लहान राहतो. जोड कांद्याचे प्रमाण जास्त निघते व साठवणक्षमता कमी होते.

पेरणी किंवा पूर्णलागवड करतो त्या वेळेसच रासायनिक खतातील शिफरशीप्रमाणे पूर्ण स्फुरद व् पालाश दिले गेले पाहिजे व् फक्त नत्र हे विभागून दोन वेळेस पिकाच्या वाढिनुसार दिले गेले पाहिजे, परंतु हल्ली 80 ते 90 % शेतकरी कांद्याला पूर्णलागवडीच्या वेळेस पहिला हप्ता व् 40 ते 45 दिवसांनी दूसरा हप्ता देतात, हे अत्यंत चुकीचे आहे, कारण स्फुरद आपण जेव्हा जमिनित देतो तो उपलब्ध होण्यासाठी जवळ जवळ 30 ते 40 दिवस लागतात, म्हणून जो आपण दुसरा हप्ता देतो तो पूर्णतः वाया जातो आपला फालतू खर्च पण होतो, म्हणून पिकाच्या शिफारस केलेल्या खतांच्या डोसापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी वाफ्यात मातीत मिसळून द्यावे व राहिलेला अर्धे नत्र 30 ते 45 दिवसाच्या आत एक खुरपणी करून द्यावे व 45 दिवसानंतर कांदा पिकास कोणतेही खत देऊ नये, दिल्यास त्याचा काही उपयोग होत नाही.

 

नत्राची आवश्यकता पिकाच्या पूर्ण वाढीकरिता अनेक अवस्थेमध्ये असते. कांद्याचे रोप लावल्यानंतर दोन महिन्यापर्यंत नत्राची गरज जास्त असते. नत्र विभागून दोन ते तीन हफ्त्यात दिले असता त्याचा चांगला फायदा होतो, कांद्याची मुळे रुजल्यानंतर नत्राची गरज असते. कांदा पूर्ण पोसल्यानंतर  मात्र नत्राची आवश्यकता नसते. अशा वेळी नत्र दिले तर डेंगळे येणे, जोड कांदे येणे, कांदा साठवणुकीत सडणे हे प्रकार होतात.

पिकांच्या मूळांच्या वाढीकरिता स्फुरदाची आवश्यकता असते. स्फुरद जमिनीत चार इंच खोलीवर लागवडी अगोदर दिल्यास नवीन मुळे तयार होईपर्यंत स्फुरद उपलब्ध होते. स्फुरदाची मात्रा एकाच वेळी आणि ती पिकांच्या लागवडी अगोदर द्यावी. स्फुरद, नत्रासोबत दिल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.

आपल्या जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर आहे.मात्र पिकांना उपलब्ध होणाऱ्या पालाशची मात्रा कमी असल्यामुळे, पेशींना काटकपणा येण्यासाठी, कांद्याचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी, तसेच कांद्याला आकर्षक रंग येण्यासाठी, पालाशची आवश्यकता पिकांच्या वाढीच्या सर्व अवस्थेमध्ये असते. पिकाच्या लागवडी अगोदर स्फुरदाबरोबर पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी.

कांद्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी त्याचप्रमाणे जमिनीत भुसभुशीत टिकवून ठेवण्यासाठी गंधकयुक्त खतांचा वापर करणे योग्य आहे. अमोनियम सल्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश यासारख्या खतांचा वापर केल्यास त्यातून काही प्रमाणात गंधकाची मात्र मिळते. अन्यथा गंधकयुक्त खतांचा वापर केल्यास फायदा होतो.

कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मॅगनीज व बोरॉन या सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. तांबे या सूक्ष्म अन्न्द्र्वयाच्या कमतरतेमुळे रोपांची वाढ खुंटते व पातीचा रंग करडा, निळसर पडतो. जास्तीची उणीव झाल्यास पाने जड होऊन खालच्या अंगाने वाकणे हि लक्षणे दिसतात. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरतेची ओळख व खात्री पटल्यानंतरच त्या त्या द्रव्याची सल्फेटच्या रुपात फवारणी करावी. त्यासाठी झिंक सल्फेट 0.1 टक्के, मॅगनीज सल्फेट 0.1 टक्के, फेरस सल्फेट 0.25 टक्के, बोरिक एसिड 0.15 टक्के या प्रमाणात फवारणी करावी. कांदा पिकास 60 दिवसांनी एकदा व 75 दिवसांनी दुसऱ्यांदा पॉलीफिड व मल्टी के याची फवारणी केल्यास कांद्याची फुगवण होते आणि वजनात वाढ होते. पॉलीफिड 6 ग्रॅम पावडर 1 लिटर पाणी तर मल्टी के 5 ते 10 ग्रॅम पावडर 1 लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.

 

जीवाणू खते: अझोस्पिरीलम व स्फुरद विरघळवणारे (पीएसबी) जीवाणू 25 ग्रॅम/किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

विद्राव्य खतांचा वापर:-

तुम्ही जरी पूर्ण शिफारशीचा डोस लागवडीच्या वेळेस दिला असेल तरी सुद्धा विद्राव्य खतांचा पिकांच्या वाढीनुसार वापर करणे गरजेचे आहे.

 

टीप - रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने विद्राव्य खताचा वापर करावा.

 

 

 

by
...