• 4
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  4
  Shares

मंथोनी नवनीता तैसे घे अनंता”  हे सुभाषित आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत. हेच तत्त्वज्ञान आपल्याला आपल्या (शेती क्षेत्रात) शेतीतही उपयोगी पडू शकते. कोणताही निर्णय घेताना चार तज्ञांना विचारून घेतला तर निश्चितच फायदा होतो. 

farmbook

farmbook


farmbook हे चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी चे  ऑनलाइन व्यासपीठ आहे. खेड्यामध्ये पूर्वी लोक पारावर बसून किंवा चावडीवर एकत्र जमा होऊन शेतीविषयक चर्चा करायचे. चर्चेमधून शेतीचे नियोजन व्हायचे. यालाच तुम्ही ऑनलाइन पार किंवा चावडी, online forum असेदेखील म्हणू शकता. एक प्रकारे हा शेतकरी साठी असलेला सोशल मीडिया आहे.


farmbook
काम कसे करते


farmbook चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात. शेतकरी येथे प्रश्न विचारू शकतो. शेतकऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला इतर शेतकरी तसेच तज्ञ शेतकऱ्याच्या भाषेमध्ये उत्तर देतील. 
farmbook सहभाग घेण्यासाठी काय करावे लागेल


farmbook मध्ये सहभागी होण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी प्रथम नोंदणी करणे गरजेचे आहे. आपण जर फेसबुक वापरत असाल तर होम पेज वर दिसणाऱ्या बटनावर क्लिक करून लॉग-इन करायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्याच बरोबर फेसबुक शिवाय लॉग-इन करता येईल. अकाऊंट तयार करण्यासाठी ई-मेल आयडी, मोबाईल नंबर नोंदविणे गरजेचे आहे.

वेबसाईट कशी दिसते


farmbook वेबसाईट दोन प्रकारे दृश्य स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.  दृश्य स्वरुप जरी वेगवेगळे असले तरी (कार्य) /back-end प्रक्रीया मात्र एकच आहे. मोबाईलवर वेबसाईट वापर करणार्या साठी वेगळी दिसेल तर कॉंपूटर पाहणा-या साठी वेगळी दिसेल. फक्त दिसण्यात फरक आहे बाकी मेनू सारखेच आहेत.


कॉंपूटर वर खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे व्हिव आहे. वरच्या बाजूला मेनू आहेत. उजव्या कोपऱ्यात असलेल्या फेसबुक बटनावर क्लिक करून लॉग-इन होता येईल.


अकाऊंट मेनू वर क्लिक केल्यास प्रोफाइल, रजीस्टर, लॉग-इन, लॉग आऊट हे चार सबमेनू मधून रजीस्टर वर क्लिक केल्यास खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. 

यामध्ये पुर्ण नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, पासवर्ड भरून नोंदणी पुर्ण करा. पासवर्ड किमान आठ अक्षरांचा असावा. त्यामध्ये एक अंक आणि एक विशेष कॅरेक्टर याचा समावेश बंधनकारक आहे.


नोंदणी केल्यानंतर आपल्याला एक तरी फिकेशन ई-मेल येईल त्यामध्ये डिटेल्स असतील. मेल बहुतेक वेळा स्पॅम फोल्डर मध्ये जाईल फोल्डर मधून मेल चेक करावा.
नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आपण farmbook फार मध्ये असलेल्या विविध सेवांमध्ये सहभागी होऊ शकता. प्रत्येक सेवांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

प्रश्न विचारणे

लॉग इन झाल्यानंतर अस्क क्वेश्चन ask question मेनू वर क्लिक करून आपण प्रश्न विचारू शकतात. यामध्ये प्रश्नाचे शीर्षक, सविस्तर प्रश्न, प्रश्नाची कॅटेगिरी ही सर्व माहिती भरावी लागेल. माहिती भरून पूर्ण झाल्यानंतर गुगल कॅप च्या सॉल्व्ह करावा लागेल. त्यानंतर आपण आपला प्रश्न सबमिट करू शकता. 


प्रश्न सबमिट झाल्यानंतर तो आमच्या एडमिन पॅनल ला निरीक्षणासाठी येईल. प्रश्नकर्ता व प्रश्नाची खात्री झाल्यानंतर आम्ही त्याला संमती देणार त्यानंतर तो प्रश्न वेबसाईटला दिसायला लागेल.


प्रश्न वेबसाईटला दिसायला लागल्यानंतर फार्मबुक तज्ञ farmbook expert त्या प्रश्नाचे उत्तरे देतील. सध्यातरी उत्तरे देणे ही सेवा आपण फक्त farmbook expert मर्यादित ठेवलेली आहे. 
काही दिवसानंतर शेतकरीही प्रश्नांचे उत्तरे देऊ शकतील. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केलेले वेगवेगळे प्रयोग शेतकरी येथे दुसऱ्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शेअर करू शकतील.

farmbook expert


आपल्याला जर फार्मबुक एक्सपर्ट म्हणून स्वतःची नोंदणी करायची असेल तर आमच्याशी संपर्क करावा. farmbook expert साठी काही मानधन देण्याचा आम्ही विचार करत आहोत. प्रत्यक्ष संपर्क झाल्यावर याबाबत माहिती सविस्तर देण्यात येईल.


farmbook forum


फोरम नावाच्या मेनू वर क्लिक करून आपल्याला वेगवेगळे फोरम दिसतील. त्यामधील कोणताही एक फोरम निवडल्यास त्या अंतर्गत असणारे वेगवेगळे टॉपिक आपल्याला दिसतील. साधारणपणे फोरमची वर्गवारी करून ठेवण्यात आलेली आहे. अंतर्गत आपण वेगळा नवीन टॉपिक स्वतः सुरू करू शकता. थोडीशी माहिती भरल्यानंतर आपल्याला हवा असलेला नवीन टॉपिक सुरू करता येईल.

farmbook Guest Post 


आपल्याला सविस्तर लिहायची आवड आहे अशा वेळी आपण farmbook वेबसाईटवर सविस्तर लेख आर्टिकल लिहू शकता. सर्वप्रथम वेबसाईटला लॉग इन होऊन articles submit मेनू वर जाऊन आपण लिहिलेला लेख आम्हाला सबमिट करू शकता.


आपला लेख सबमी झाल्यानंतर तो आमच्या निरीक्षण पॅनलला दिसेल. तदनंतर आम्ही आपल्याशी संपर्क करून तो लेख प्रकाशित करू. लेख लिहिण्यासाठी आपणास मानधन देण्यात येईल. 

आपला लेख सबमी झाल्यानंतर तो आमच्या निरीक्षण पॅनलला दिसेल. तदनंतर आम्ही आपल्याशी संपर्क करून तो लेख प्रकाशित करू. लेख लिहिण्यासाठी आपणास मानधन देण्यात येईल. 

farmbook expert

आपल्याला जर फार्मबुक एक्सपर्ट म्हणून स्वतःची नोंदणी करायची असेल तर आमच्याशी संपर्क करावा. farmbook expert साठी काही मानधन देण्याचा आम्ही विचार करत आहोत. प्रत्यक्ष संपर्क झाल्यावर याबाबत माहिती सविस्तर देण्यात येईल.


farmbook news

आतापर्यंत वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी दखल घेऊन कौतुक केलेले आहे. न्यूज चैनल वर प्रसारित झालेल्या बातम्या आपण येथे पाहू शकता. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्याा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 •  
  203
  Shares
 • 203
 •  
 •  
3 thoughts on “farmbook काय आहे….”

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.