• 6
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  6
  Shares

कृषी विभागात महाराष्ट्र शासनाने अधिकारी, शेतकरी ठिबक उत्पादक कंपन्या व ठिबकचे डीलर या सर्वांचे संनियंत्रण व समन्वय यासाठी तयार केलेली ऑनलाईन प्रणाली म्हणजेच ethibak होय.

ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक अनुदानासाठी अर्ज करणे सोपे व सोयीस्कर झाले आहे. त्याचबरोबर अनुदान देण्याबाबतची प्रक्रिया गतिमान झाली आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सूक्ष्म सिंचनासाठी जाहीर केलेली आहे. योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन जसे की ठिबक सिंचन तुषार सिंचन संच शेतामध्ये बसविण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना योजनेमध्ये सामावून शेतकर्याचे उत्पादन वाढविण्यास मदत करणे.


शेतीमध्ये काही समस्या आहे आम्हाला विचारा

फार्मबूक काय आहे हे जाणून घ्या

परंपरागत कृषी विकास योजना


पाण्याचा प्रत्येक थेंब कार्यक्षमरित्या वापरला जावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेचे ब्रीदवाक्य per drop more crop असे आहे. पाणी देण्याच्या पारंपारिक पद्धती मध्ये 60% टक्क्याहून अधिक पाण्याचा अपव्यय होतो

महाराष्ट्र राज्याचे जवळपास 80 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आणणे जेणेकरून शेतकऱ्याची जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता येऊन त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नेशनाल मिशन ओन मायक्रो इरिगेशन या योजनेखाली अनुदान उपलब्ध करुन देण्यात येत असे.

ethibak

ठिबक साठी ची ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना लिखित स्वरूपात कृषी विभागाकडे अर्ज सादर करावा लागत होता.

अर्जांच्या छाननीनंतर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पूर्वसंमती दिली जायची. त्यानंतर मान्यताप्राप्त ठिबक प्रतिनिधीकडून शेतकरी ठिबक संच कार्यान्वित करून घेत असे.

ही सर्व कार्यपद्धती लिखित स्वरूपाची असल्यामुळे वेळखाऊ किचकट स्वरूपाची होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास विलंब होत असे. या सर्व पार्श्वभूमीवर ethibak प्रणाली शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.

इ ठिबक प्रणाली चे महत्त्व

ही सर्व प्रणाली ऑनलाइन असल्यामुळे अनेक बाबतीत त्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.


शेतीमध्ये काही समस्या आहे आम्हाला विचारा

फार्मबूक काय आहे हे जाणून घ्या

परंपरागत कृषी विकास योजना


१. शेतकऱ्यांचे अर्ज मागवणे व त्यांना पूर्वसंमती देणे पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक गतिमान झाले आहे.

२. मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे पारदर्शकता पूर्वीपेक्षा अधिक आहे.

३. दराच्या बाबतीत होणारी शेतकऱ्यांची फसवणूक कमी झाली आहे.

४. आधार संलग्न असल्यामुळे अनुदानासाठी ची होणारी द्विरूक्ती टाळली जात आहे.

५. जिओ टॅगिंग असल्यामुळे ठिबक बसवलेल्या प्लॉटची अचूकपणे स्थान निश्चिती होते.

६. शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास पूर्वीपेक्षा आता कमी वेळ लागतो.

७. शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहता येते.

८. पूर्वसंमती देणे या बाबी मध्ये मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे लाभार्थी वंचित राहत नाही.

९. ethibak योजनेचे संनियंत्रण करणे कृषी विभागाला सहज शक्य होत आहे.

१०. योजनेची प्रत्येक टप्प्यावरील माहिती शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे पाठविल्या जाते.

११. सर्वच प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे एकंदरीत योजनेतील गतिमानता व पारदर्शकता वाढली आहे.

ई ठिबक उद्दीष्टे

१. महाराष्ट्रामध्ये सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणावरील शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान उपलब्ध करून देणे.

२. सर्व प्रशासकीय कार्यपद्धती केंद्रीय पद्धतीने पार पाडणे जेणेकरून योजनेचे सनियंत्रण शेतकऱ्यापासून थेट राज्य स्तरापर्यंत करणे सोपे होईल.

३. ethibak प्रणाली पूर्णपणे संगणीकृत व स्वयंचलित असल्याने पारदर्शकता व विश्वासहर्ता निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.

४. पोर्टल स्वयंचलित असल्याकारणाने अनुदान निश्चितीबाबत ऑटोमेशन करून लाभार्थ्यांपर्यंत मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अनुदान वितरित करणे.

५. मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पात्र लाभार्थ्यांची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना पर्यंत लाभ पोहोच करणे.

ई ठिबक वेबसाईट

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना साठी राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र यांनी http://mahaethibak.gov.in/ हे पोर्टल विकसित केलेले आहे. या पोर्टल वरती शेतकरी, ठिबक उत्पादक, ठिबक वितरक नोंदणीकरण सहभागी होऊ शकतात.

ethibak, ethibak 2020
ethibak.gov.in

पोर्टल इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेत कार्यान्वित आहे. पोर्टल वर गेल्यानंतर उजव्या कोपऱ्यात इंग्रजी व मराठी भाषा बदलण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. हव्या असलेल्या भाषेवर क्लिक केल्यानंतर त्या भाषेमध्ये वेबसाईट परावर्तित होते.

ई ठिबक सुविधा

सूक्ष्म सिंचन ऑनलाईन प्रणालीवर शेतकरी, सूक्ष्म सिंचन संचाचे उत्पादक व वितरक, या प्रत्येक घटकाच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांच्यासाठी ethibak प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

शेतकरी

ethibak प्रणाली वरती शेतकऱ्यांना नोंदणी करणे सूक्ष्म सिंचनासाठी अर्ज सादर करणे या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ethibak वेबसाईट वर गेल्यानंतर या मेनू खाली शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करता येते.

शेतकरी नोंदणी

प्रथम शेतकऱ्यांना आधार क्रमांक व मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरून स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक लाभार्थी क्रमांक beneficiary id दिला जातो.

अर्ज सादर करणे

Beneficiary id च्या मदतीने शेतकरी ethibak योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करू शकतो. ethibak अनुदानासाठी अर्ज दाखल करताना सूक्ष्म सिंचन बसविण्याच्या शेताचा गट क्रमांक, लागवड केलेले पिक यापूर्वी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याची माहिती भरणे बंधनकारक आहे.

पूर्ण माहिती भरुन अर्ज दाखल केल्यानंतर शेतकऱ्याला एक अर्ज क्रमांक application ID प्रदान केला जातो. बेनेफिशिरी आयडी व  अॅपलिकेशन आयडी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेता येते.

पूर्वसंमती मिळाले नंतर

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्याने ethibak सूक्ष्म सिंचन संच शेतामध्ये बसवून कार्यान्वित करणे गरजेचे आहे. कार्यालय झाल्यानंतर तशी माहिती आवश्यक कागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात द्यावी.

उत्पादक व वितरक

उत्पादक कंपनी

सूक्ष्म सिंचन उत्पादक कंपनीने स्वतःची नोंदणी प्रणालीवर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर कृषी विभागाकडून त्यांना विशिष्ट जिल्ह्यामध्ये विक्री परवाना दिला जातो. त्याच जिल्ह्यांमध्ये कंपनीला अधिकृतरित्या वितरक नियुक्त करता येतात.

सूक्ष्म सिंचन उत्पादक कंपनीला आपल्याकडील उत्पादनांचे दर ethibak प्रणालीवर जाहीर करणे बंधनकारक आहे. हे दर शेतकऱ्यांना माहिती झाल्यामुळे वितरकाकडून होणारी फसवणूक टाळल्या जाऊ शकते.

वितरक /डीलर

शेतकऱ्याने अर्ज ऑनलाइन सादर करताना सूक्ष्म सिंचन संच उत्पादक कंपनी व त्यांच्या वितरकांची निवड केलेली असते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्याच्या अर्जाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर ऑनलाईन रित्या त्याची माहिती डीलरला मिळते.

पूर्व संमती मिळाल्यानंतर वितरकांनी कंपनी प्रतिनिधी तिच्यामार्फत शेतकऱ्याच्या शेताचा सर्वे करून सूक्ष्म सिंचन संच कार्यान्वित करून देणे. व त्याचे ethibak प्रणाली वर अपलोड करणे. सर्व प्रस्तावाची हार्ड कॉपी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करणे.

शेतकऱ्यांना विक्रीपश्चात सेवा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर संच वापरण्या विषयीचे व देखभालीचे वेळी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे या बाबींची जबाबदारी वितरकांवर राहील

कृषि विभाग

ethibak मधील महत्त्वाचा घटक तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे. शेतकरी अर्जाची छाननी करणे, पूर्वसंमती लेणे, मोका तपासणी करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कामे कृषी विभागाकडून पार पाडली जातात.

पूर्वसंमती देणे

शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तो तालुका कृषी अधिकारी कार्यालयास ऑनलाइन रित्या प्राप्त होतो. तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेतकऱ्याने भरलेल्या माहितीची छाननी करून आर्थिक लक्षांकाच्या अधीन राहून शेतकऱ्यांना पूर्वसंमती प्रदान करतात.

मोका तपासणी करणे

शेतकऱ्याने ethibak सूक्ष्म सिंचन संच बसून कार्यान्वित केल्यानंतर तसा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्राप्त होतो. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने आपल्या अधिनस्त असलेल्या मंडळ कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून सूक्ष्म सिंचन संचाची मोफत तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

कृषी पर्यवेक्षक यांनी कंपनी प्रतिनिधींसह संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ethibak  सूक्ष्म सिंचन संचाची स्थळ पाहणी व मोका तपासणी करणे. संचाची जिओ टॅगिंग करून त्याची माहिती अपलोड करणे व अनुदानासाठी शिफारस करणे.

अनुदानासाठी प्रस्ताव सादर

कृषी पर्यवेक्षक यांनी स्थळ पाहणी करून मोका तपासणी केल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ethibak प्रस्ताव पुन्हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अनुदानासाठी सादर केला जातो.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव ची पुन्हा छाननी होऊन  ethibak प्रणालीद्वारे त्याची शिफारस उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयास ऑनलाइन पद्धतीने सादर केली जाते.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून ethibak सूक्ष्म सिंचन प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करुन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाकडे ऑनलाइन पाठविणे.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय सूक्ष्म सिंचन प्रस्तावाची पुन्हा छाननी करून शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पी एफ एम एस प्रणालीद्वारे अनुदान अदा करते.

Tags

ethibak, e-thibak

ethibak, maha ethibak

 •  
  6
  Shares
 • 6
 •  
 •  
2 thoughts on “महा ई ठिबक | farmbook.co.in”

Comments are closed.

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.