• 3
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  3
  Shares

ginger-on-gray-surface-1337585 unnamed-4.png

आले लागवड तंत्रज्ञान
परीक्षित करपे, बी.एससी. (कृषि)

महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात आल्याची लागवड ( ginger farming ) कमी-अधिक प्रमाणात केली जाते. बहुगुणी मसाल्याचे पीक म्हणून आले प्रसिद्ध आहे. तसेच त्याला औषधी गुणधर्म असल्यामुळे हे एक महत्त्वाचे पीक आहे.

महाराष्ट्रात आल्याची लागवड ( ginger farming ) फक्त सातारा, ठाणे व रायगड जिल्ह्यातच होऊ शकते असा समज असल्यामुळे या पिकाचा प्रसार फारसा झालेला नव्हता परंतु अन्य जिल्ह्यांतही या पिकाची लागवड होऊ शकते. सांगली, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यातही आता आल्याची लागवड वाढली आहे.

आले लागवड ( ginger farming )

आल्याचे जगाच्या 24 टक्के उत्पादन एकट्या भारतात होते. उत्तम निचऱ्याची जमीन असेल तर आले 14 ते 16 महिन्याचे जमिनीत ठेवून द्वीहंगामी पीक घेता येते. आल्याचे उत्पादन मसाला पीक म्हणून तसेच औषधी वनस्पती म्हणून मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

आल्याचा उपयोग खोकल्यावर गुणकारी आहे. लोकांचा आवडता चहा यामध्ये आल्याचा वापर वाढला आहे. तसेच त्यापासून लोणचे व सुंट बनवितात. आल्याचे उपयोग चॉकलेटमध्ये सुद्धा अलीकडच्या काळात होऊ लागला आहे. आल्याच्या निर्यातीस सुद्धा चांगला वाव आहे.

हवामान व जमीन : उष्ण व दमट तसेच उष्ण व कोरड्या हवामानात आहे आले ( ginger farming ) चांगल्या प्रकारे येते. चांगल्या उगवणीसाठी 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमान आल्याच्या होण्यासाठी अनुकूल असते.

वाढीच्या काळात 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते तसेच हिवाळ्यात थंड हवा देखील उपयुक्त ठरते. साधारणतः २५ टक्के सावलीच्या ठिकाणी पीक चांगले येते जसे नारळ किंवा सुपारीच्या बागेत.

मध्यम प्रतीची पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आल्यासाठी योग्य असते. जमिनीची खोली कमीत कमी 30 सेंटिमीटर असावी. सामू 6.5 ते 7 असावा.

ginger farming जाती


माहीम

210 दिवस कालावधी
सुंटेचे प्रमाण 20.07%
महाराष्ट्रात प्रचलित, मध्यम उंची असून सरळ वाढ होणारी जात

महिमा सूत्रकृमी प्रतिकारक्षम
वरदा : रोग व किडीस सहनशील
रिजाथा : सुगंधी द्रव्य 2.36 टक्के

पूर्वमशागत


30 सेंटीमीटर खोल उभी-आडवी नांगरट करावी
दोन-तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी 30 ते 40 टन शेणखत व स्फुरद व पालाश खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा.

लागवड


सरी- वरंबा पद्धत


45 सेंटिमीटर वर सरी पाडावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूस पाच सेंटीमीटर खोल लागवड करावी. दोन रोपातील अंतर 22.5 सेंटिमीटर ठेवावे.

सपाट वाफे


सपाट वाफे 2 x 1 किंवा 2 x 3 मिटर अंतरावर जमिनीच्या उतारानुसार पाडावेत.
20 x 20 किंवा 22.5 x 22.5 मी सेमी अंतरावर लागवड करावी.

गादीवाफा पद्धत


काळी जमीन ठिबक व तुषार सिंचन तेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या पद्धतीने ( ginger farming ) लागवड करावी इतर पद्धतीपेक्षा या पद्धतीत 15 ते 20 टक्के उत्पादन जास्त मिळते.
120 सेंटिमीटर सरी पाडून मधील वरंबा 60 सेंटिमीटर रुंदीचा होईल हे पहावे.
उंची 20 ते 25 सेंटिमीटर ठेवावी आणि 22.5 x 22.5 मी सेमी अंतरावर लागवड करावी.

हंगाम


आल्याची लागवड ( ginger farming ) मेच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादनात वाढ होते.
साधारणतः 15 एप्रिल पासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आल्याची लागवड केली जाते. उशिरा लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
निरोगी बियाण्याची निवड करावी. बियाणे निवडताना कंदाचे वजन 25 ते 55 ग्रॅम च्या दरम्यान असावे तसेच लांबी 2.5 ते 5 सेंटिमीटर असावी.


बियाणे सुप्तावस्था संपलेले 2 ते 3 डोळे फुगलेले निवडावे. हेक्टरी 25 क्विंटल बियाणे लागते.
लागवड करताना कंद 2 इंच (4 – 6 सेमी) खोल लावावा. लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूस असल्यास त्या डोळ्यापासून असणारा कोंब मजबूत असतो व त्यांची चांगली वाढ होते. जर डोळा खालच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने राहिल्यास कमकुवत राहतो. लागवडीच्यावेळी कंद पूर्ण झाकले जातील याची काळजी घेण्यात यावी.

बीजप्रक्रिया

रासायनिक कीडनाशकाची बीजप्रक्रिया करताना क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा डायमेथोएट 30 टक्के 10 मिली यापैकी एक आणि कार्बेंडीझम 15 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 30 ग्रॅम यापैकी एक 10 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद 15 ते 20 मिनिटे चांगले बुडवावीत. वीस मिनिटानंतर बियाणे सावलीत सुकवून त्यावर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.


बियाणे सावलीत सुकवल्यानंतर लागवडीच्या ( ginger farming ) अगोदर ॲझोस्पिरिलम 25 ग्रॅम, पी एस बी 25 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून 10 ते 15 मिनिटे बियाणे बुडवून ठेवावे त्यानंतर लागवड करावी.
बियाणे प्रक्रियेसाठी 10 लिटर द्रावण 100 ते 125 किलो बियाण्यास वापरावे.

तणनाशकाचा वापर


लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ऍट्राझीन 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लागवडीनंतर उगवणीपुर्वी बारा ते पंधरा दिवसांनी 4 ते 5 मिली ग्लायफोसेट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खत व्यवस्थापन


हेक्टरी 120 :75 :75 किलो या प्रमाणात.
स्फुरद आणि पालाशची मात्रा जमीन तयार करतेवेळी द्यावी. नत्रयुक्त खते उगवण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्यांनी निम्मा हप्ता द्यावा. राहिलेला अर्धा नत्र पेरणीच्या वेळी म्हणजे 2.5 ते 3 महिन्यांनी द्यावा. त्यावेळी 1.5 ते 2 टन करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने हेक्टरी 40 किलो पालाश दोनवेळा मिसळावे.

पाणी व्यवस्थापन

लागवडीनंतर ( ginger farming ) आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसऱ्या चौथ्या दिवशी द्यावे.
पावसाळ्यामध्ये 10 ते 15 दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे.
हिवाळ्यात 12 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

ई ठिबक प्रणाली

आंतर मशागत

तणनाशकांचा वापर केला नसल्यास वेळच्यावेळी खुरपणी करावी. उटाळणी पीक 2.5 ते 3 महिन्याचे असताना करावी. उटाळणी म्हणजे लांब दांड्याच्या खुरप्याने माती हलवली जाते यामुळे मुळ्या तुटून त्याठिकाणी नवीन तंतुमय मुळे फुटतात. आले पीकास पाचव्या ते सहाव्या महिन्यात फुले येतात त्याला हुरडे बांड असे म्हणतात. उटाळणी वेळेवर केली नाही उत्पादनामध्ये 10 ते 15 टक्के घट येते. उटाळणी नंतर पाण्याचा हलका ताण द्यावा म्हणजे फुटवे चांगले फुटतात. आल्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर, झेंडू, मिरची, गवार यासारखी पिके घेता येतात. आंतरपिकाची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही याची काळजी घ्यावी.

संजीवकाचा वापर

उत्पादनात वाढ ( ginger farming ) तसेच तंतूचे प्रमाण कमी करण्यासाठी युरिया व नॅप्थील ऍसिटिक ऍसिड याचा वापर 60 आणि 75 व्या दिवशी शिफारशीप्रमाणे करावा.
फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी 200 पीपीएम प्रमाणात इथेफॉनच्या 75 व्या दिवसापासून 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.

कीडनियंत्रण

कंदमाशी

डासांसारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असून अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजिवीका करतात.
व्यवस्थापन
जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून घ्यावेत.
क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 15 मिली प्रती 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान आलटून-पालटून 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

पाने गुंडाळणारी आळी


ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तिचा प्रादुर्भाव दिसून येतो किडीची अळी हिरवट रंगाची असून ते अंड्या बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पण खाते.
व्यवस्थापन
गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. डायक्लोरव्हॉस 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सूत्रकृमी


मुळातील अन्नद्रव्यांचे शोषण केल्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात यांनी केलेल्या क्षेत्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशींचा प्रादुर्भाव होतो.
व्यवस्थापन :
लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी 5 किलो ट्रायकोडर्मा प्लस शेणखतात मिसळून द्यावे.
प्रति हेक्टरी फोरेट 10 जी 25 किलो या प्रमाणात जमिनीत मिसळून द्यावे किंवा 2 टन निंबोळी पेंड जमिनीत मिसळून द्यावी.

खोड पोखरणारी अळी


जुलै ते ऑक्टोबर मध्ये आढळून येते हे आणि छोट्या खोडाला छिद्र करून उपजीविका करते त्यामुळे खोड पिवळे पडून वाळण्यास सुरवात होते अळीने पडलेल्या छिद्रावर जाळीदार भाग दिसतो.
व्यवस्थापन :
एक महिन्याच्या अंतराने 4 ग्रॅम इमामेक्टीन बेंझोएट 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.

रोग

कंदकूज


ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीत आढळणारा हा रोग प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डा ही वरून काळा पडलेला दिसतो.
व्यवस्थापन
शिफारशीप्रमाणे लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
हा रोग शेतामध्ये आढळून आल्यास आलटून-पालटून खालील बुरशीनाशकांची फवारणी करावी. मेटॅलॅक्झील 8% + मॅन्कोझेब 64 टक्के हे संयुक्त बुरशीनाश 2.5 क ग्रॅम प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात किंवा
कार्बेन्डाझिम 50 डब्ल्यू पी 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात किंवा
मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून या प्रमाणात.

पानावरील ठिपके


रोगाची सुरुवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानावर पसरतो पानावर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात.
व्यवस्थापन
25 ते 30 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 10 ते 15 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा एक टक्का बोर्डो मिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामान परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

काढणी व उत्पादन

पीक 75 टक्के परिपक्व झाल्यानंतर काढणी करता येते. हिरवे आले म्हणून वापरायचे असल्यास पिकाची काढणी सहा महिन्यांनी करावी. विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आठ महिन्यानंतर काढणी करावी. बाजारातील मागणीप्रमाणे काढणी करावी. गड्डे बाहेर काढताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढणीनंतर कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावेत त्यानंतर बाजारात पाठवावेत.

उत्पादन


प्रति हेक्टरी ओल्या आल्याचे सरासरी 14 ते 22 टन.

कृषी विभाग, महाराष्ट्र

ginger farming, ginger plantation, ginger cultivation in india, ginger production in india, ginger crop, ginger crop, ginger farming profits, ginger farming in india

 •  
  3
  Shares
 • 3
 •  
 •  

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.