•  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

covid-19 च्या प्रादुर्भाव वाढल्यानंतर व लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर आपल्या कानावर अनेकदा झूम मीटिंग फेसबुक लाईव्ह युट्यूब लाईव्ह हे शब्द कानावर पडले असतील.

शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी या सुविधांचा वापर वाढला आहे . या सर्व सेवांना ICT in Agriculture म्हणून ओळखले जाते.

इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ( ICT in Agriculture ) हा विषय आपल्या सर्वांना माहीतच आहे. संक्षिप्त मध्ये याचे नाव आयसीटी असे आहे. हे तंत्रज्ञान नसते तर कदाचित आपला आजचा संवाद शक्य झाला नसता.

आय सी टी एग्रीकल्चर या मुख्य विषयाकडे येण्यापूर्वी आपण थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊयात.

सुरुवातीच्या काळामध्ये संगणकाला भारतात प्रचंड विरोध करण्यात आला. भारतासारख्या प्रचंड बेरोजगारी असणाऱ्या देशांमध्ये या तंत्रज्ञानामुळे बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढेल अशी टीका संगणकावर करण्यात आली.

ज्या कम्प्युटर मुळे भारतात बेरोजगारी वाढेल अशी टिका करण्यात आली होती त्याच कॉम्प्युटरमुळे माहिती तंत्रज्ञानाची जागतिक राजधानी अशी भारताची ओळख निर्माण झाली आहे.

प्रारंभी फक्त कार्यालयीन कामकाजासाठी वापरले जाणारे संगणक आज प्रत्येकाच्या हातामध्ये स्थिरावले आहेत. आज जर आपल्या आयुष्यातून संगणक वजा केला तर काय होईल याची कल्पनाही ही करता येत नाही.

सन 2000 मध्ये वाय टू के मुळे संगणक विश्वात व एकूणच जगभरात किती खळबळ माजली होती हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलच.

इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ( ICT in Agriculture ) मध्ये प्रमुख्याने मोबाईल , नेटवर्क, इंटरनेट, सॉफ्टवेअर, कम्प्युटर यांचा समावेश होतो.

सर्वच क्षेत्र इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीने व्यापल्या मुळे शेती त्यापासून दूर कशी राहील. शेती क्षेत्रातही दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

ICT in Agriculture

इंफॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन एग्रीकल्चर थोडक्यात आय सिटी इन ॲग्रीकल्चर ( ICT in Agriculture ) दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ई-एग्रीकल्चर असेही म्हणता येईल.

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत बोलायचे झाले तर एकूण जीडीपीच्या 17 टक्के वाटा शेतीक्षेत्रा मधून येतो.

इतक्या मोठ्या लोकसंख्येचे व्यवस्थापन करणे, जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करून जीवनमान उंचावण्यास मदत करणे या सर्व बाबी इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी च्या ( ICT in Agriculture ) मदतीने उत्तम प्रकारे पार पडल्या जाऊ शकतात.

शेतकऱ्या समोर मुख्यतः महसुली दस्तावेज उपलब्ध होणे, वित्तीय पुरवठा, दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा होणे, पिक उत्पादन तंत्रज्ञान, हवामानाची माहिती बाजार भाव आणि विक्री व्यवस्था या अडचणी किंवा प्रश्न असतात.

या सर्व अडचणींवर मात करण्याच्या त्या सोडवण्याच्या माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी च्या मदतीने जगभरात वेगवेगळे प्रयोग राबविण्यात आले आहेत तसेच यापुढेही असे प्रयोग चालूच राहतील.

अशाच काही ही इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी ( ICT in Agriculture ) च्या मदतीने शेतीसमोरील आव्हाने सोडवण्यासाठी चे वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत किंवा प्रणाली विकसित करण्यात आलेले आहेत त्या सर्वांची माहिती घेण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करू.


रिमोट सेंसिंग इन अग्रिकल्चर


महसुली दस्तावेज

शेतकर्‍यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा दस्तावेज जर कोणता असेल तर तो जमिनीचा सातबारा उतारा होय. सर्व प्रकारचे महसुली दस्तावेज शेतकऱ्यांना मालकीहक्क सांगण्यास सोबतच इतरही कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गरजेचे असतात.

ग्रामीण भागामध्ये अनेक वाद विवाद हे जमिनीच्या निगडित असतात त्यामध्ये मालकीहक्क, जमिनीच्या सीमा निश्चित नसणे यामुळे वर्षानुवर्षे शेतकरी कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकून पडलेले असतात.

भारत सरकारने डिजिटल इंडिया नॅशनल लँड रेकॉर्ड मोडरनिझेशन प्रोग्रम राबवून सर्व शेतकऱ्यांना महसुली दस्तावेज सुलभरीत्या कसे उपलब्ध होतील यासाठी सॉफ्टवेअर व ॲप्लिकेशन तयार करून ऑनलाईन रित्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ( ICT in Agriculture ) हा सर्वोत्कृष्ट उपयोग म्हणावा लागेल ज्यामुळे खेड्यांमधील विवादित असलेले अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

भूनक्षा, भूलेख या संगणकीय प्रणालीमुळे ेतकर्‍यांना आपल्या जमिनीचा नकाशा मोबाईलवर पाहता येतो तो डाऊनलोडही करता येतो. भूलेख ही प्रणाली सातबारा उतारा 8 अ शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देते.

पतपुरवठा

शेती यशस्वी होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका वित्तपुरवठा ची असते. शेतीसाठी लागणारे यंत्रसामग्री बियाणे खते कीटकनाशके मजुरांचे पगार या बाबींसाठी वेळेवर दूध पुरवठा होणे गरजेचे असते.

वेळेवर वित्त पुरवठा झाला नाही तर नाईलाजाने शेतकऱ्यांना सावकाराकडून अवाजवी दराने कर्ज घ्यावे लागते. राष्ट्रीय बँका तसेच सहकारी बँका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करतात परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रांचा पुरवठा करावा लागतो.

केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड या अभिनव संकल्पनेतून शेतकऱ्यांना वेळेवर वित्त पुरवठा व्हावा या उद्देशाने कार्यप्रणाली विकसित केली आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी विशिष्ट मर्यादेपर्यंत विना कागदपत्र कर्जाची रक्कम प्राप्त करू शकतो. ही सर्व प्रक्रिया इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ( ICT in Agriculture ) या तत्त्वावरच आधारलेली आहे.

खाजगी बँकांनीही कर्ज प्रक्रिया सुलभ होण्यासाठी वेगवेगळ्या ॲप्लिकेशनची निर्मिती केलेली आहे. या सर्व ऑनलाइन कार्यप्रणाली मुळे शेतीला होणारा पतपुरवठा काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

दर्जेदार निविष्ठा

मधून चांगले उत्पादन येण्यासाठी दर्जेदार आणि वरिष्ठांचा वेळेवर पुरवठा होणे गरजेचे असते अन्यथा प्रचंड मेहनत व श्रम त्याचबरोबर खर्चही वाया जाण्याची शक्यता असते.

बियाणे खते औषधे यांचा दर्जा शेतीमधील उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. शेती निविष्ठांचे उत्पादक किंवा पुरवठादार हे विखुरलेल्या स्वरूपात असतात.

ICT in Agriculture

इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ( ICT in Agriculture ) वापराने दर्जेदार निविष्ठा उत्पादक किंवा पुरवठादार व शेतकरी यांच्यामध्ये समन्वय घातला जाऊन शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा पुरविला जाऊ शकतात.

अनेक खासगी कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा पुरविण्यासाठी कार्यप्रणाली विकसित केलेली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा उत्पादक व पुरवठादार यांची माहिती मिळण्या सोबतच ऑनलाइन पद्धतीने खरेदीही केल्या जाऊ शकते.

पीक उत्पादन तंत्रज्ञान

आधुनिक व शास्त्रीय पीक उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे गरजेचे असते. भारतासारख्या विशाल व खंडप्राय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भौगोलिक अडचणी सोबतच दळणवळणाच्या ही अडचणी आहेत.

रोग-किडी पासून पिकांचे संरक्षण करणे, मातीच्या पृथक्करण विश्लेषण अहवालानुसार रासायनिक खतांचा सुयोग्य वापर करणे, पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्यांचे व्यवस्थापन करणे इत्यादी माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये उपलब्ध होणे गरजेचे असते

अशावेळी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एग्रीकल्चर ( ICT in Agriculture ) च्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पीक उत्पादन तंत्रज्ञान थेट त्याच्या बांधावर उपलब्ध करून दिले जात आहे.

शेतकऱ्यापर्यंत पीक उत्पादन तंत्रज्ञान पोहोच करण्यासाठी एसएमएस, रेकॉर्ड ऑडिओ कॉल, वेबसाईट, व्हिडिओ, इमेज इत्यादींचा वापर केला जात आहे. यासाठी कृषी विभाग कृषी विद्यापीठ तसेच काही खाजगी संस्थांनी ही वेगवेगळ्या प्रणाली विकसित केलेल्या आहेत.

विक्री व्यवस्था


पिकवता येते पण विकता येत नाही अशी काही शेतकऱ्यांची अडचण आहे. स्थानिक बाजारांच्या अनेक मर्यादा असतात. मध्यस्थांची साखळी शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील मोठा वाटा काढून घेते. याचा परिणाम थेट शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्न कमी होण्यावर होतो.

उत्पादक ते ग्राहक ही एक छानशी संकल्पना आहे. यामध्ये मध्यस्थांची साखळी तोडून शेतमालाची पूर्ण किंमत शेतकऱ्याला मिळते.

भारत सरकारने शेतमाल विक्रीसाठी राष्ट्रीय स्तरावर इलेक्ट्रॉनिक बाजार व्यवस्था निर्माण केली आहे. इलेक्ट्रॉनिक नेशनल एग्रीकल्चर मार्केट थोडक्या मध्ये इनाम असे तिचे नाव आहे.

या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी आपला शेतमाल भारतातील कोणत्याही बाजार समितीमध्ये विकू शकतो. शेतमालाचे होणारे सौदे पूर्णतः पारदर्शक पणे पार पाडले जातात.

काही शेतकरी त्याच सोबत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्याकडील शेतमाल थेट ग्राहकांना पोहोच करण्यासाठी ई-कॉमर्स या कार्यप्रणालीचा वापर करून ऑनलाइन विक्री सुद्धा सुरू केली आहे.

स्वयंचलित यंत्रणा

मोबाईल वरून विहिरीवरील मोटर पंप चालू करणे हे याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल. अनेक शेतकरी सध्या ठिबकचे ऑटोमेशन वापरत आहेत. ऑटोमेशन केलेल्या ठिबकमुळे शेतामध्ये सर्वत्र गरजेप्रमाणे व समान दाबाने पाण्याचे वितरण करणे शक्य आहे.

स्वयंचलित यंत्रणा असल्याने शेतकऱ्यांना ठिबक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी लागणारे मनुष्यबळाची आवश्यकता नाही. पिकांच्या पाण्याच्या गरजेप्रमाणे ठिबक यंत्रणा स्वयंचलितपणे कार्यालयात होते

हरितगृहामध्ये स्वयंचलित यंत्रणा मोठ्या प्रमाणात वापरले जाते. हरितगृहामधील तापमान नियंत्रित करणे, आद्रतेचे नियमन करणे यासाठी स्वयंचलित यंत्रणेद्वारे सहज शक्य आहे.

आज आपण येथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन एग्रीकल्चर ( ICT in Agriculture ) या विषयाची प्राथमिक ओळख करून घेतली. तंत्रज्ञानाची आपण येथे ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला ते दृश्य स्वरूपातील आहेत. म्हणजे दिसायला जरी वेबसाईट असली तरी त्या पाठीमागे अनेक गुंतागुंतीचे तंत्रज्ञान असते. अनेक ठिकाणावरून माहिती जमा केली जाते त्या माहितीवर पृथक्करण करून त्याच्या विश्लेषण आधारे आपल्या समोर निष्कर्ष ठेवले जातात.

माहिती जमा करण्यासाठी रोबोट, सेन्सर्स, आय ओ टी, एग्रीकल्चर ड्रोन, सॅटलाईट इत्यादीं साधनांचा वापर केला जातो. यामध्ये प्रचंड प्रमाणात माहिती जमा होते. ही सर्व जमा झालेली माहिती ‘बिग डेटा’ नावाने संबोधले जाते. सर्वांची माहिती आपण क्रमशः घेणार आहोत..

ICT in Agriculture video

अधिक माहितीसाठी विकिपीडिया

Tags

ICT in agriculture

  •  
  •  
  •  
  •  
4 thoughts on “आयसिटी इन एग्रीकल्चर | farmbook.co.in”

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.