•  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
covid-19 मुळे सर्व जग संकटात सापडलेले आहे. शेती क्षेत्र त्याला अपवाद राहिलेले नाही. सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने काही बाबींवर मार्ग काढता येऊ शकतो. कृषी व सहकार मंत्रालय, भारत सरकार यांनी kisan rath नावाने मोबाईल विकसित केले आहे.
शेतीचा रब्बी हंगाम सुरू आहे, पिकांची काढणी मळणी सुरू असून शेतकरी धान्य भाजीपाला बाजारात नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लॉक डाऊन मुळे वाहतुकीवर निर्बंध असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीकरिता नेण्यासाठी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. अशावेळी kisan rath ॲप्स शेतकऱ्यांचा निश्चितच मदतगार ठरू शकतो.
व्यापारीही शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत कारण खरेदी केलेला शेतमाल इतरत्र पाठवण्यासाठी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. kisan rath ॲपच्या माध्यमातून शेतकरी व्यापारी व वाहतूक सेवा पुरवठादार एका व्यासपीठावर आणून त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे

kisan rath

हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर असून सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) यांनी हे विकसित केलेले असल्यामुळे वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. गुगल प्ले स्टोअर वर जाऊन kisan rath असे सर्च करावे किंवा येथे क्लिक करून आपण आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करू शकता. kisan rath

kisan rath उद्देश

शेतमाल वाहतुकीसाठी येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून शेतमाल वाहतूक सुरळीत व्हावी ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी अडचणी येणार नाहीत. अनेकदा शेतमाल वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे शेतात किंवा घरी तसाच पडून राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. लॉक डाऊन काळानंतरही शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारे आहे. आजच्या माध्यमातून शेतकरी व्यापारी व वाहतूक सेवा पुरवठादार यांच्यामध्ये समन्वयाचा सेतू बांधला जाणार आहे.

नोंदणी

प्ले स्टोर वरून ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येईल. मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवून व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होईल. रजिस्ट्रेशन करताना शेतकरी व्यापारी किंवा सर्विस प्रोव्हायडर यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. आपण शेतकरी असाल तर शेतकरी हा पर्याय निवडावा.
ओटीपी टाकून वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर पुन्हा पासवर्ड चा समावेश असलेला मेसेज येईल. हा पासवर्ड टाकून आपल्याला लोगिन होता येईल. त्यानंतर पुन्हा आपल्याला पासवर्ड चेंज करावा लागेल.

शेतकरी

kisan rath मध्ये लॉगिन झाल्यानंतर खालील प्रमाणे आपल्याला स्क्रीन दिसेल. त्यामध्ये पोस्ट लोड यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला काही मुलभूत माहिती विचारली जाईल ती आपण भरावी. सुरुवातीला आपल्याला शेतमाल कुठून कुठे न्यायचा आहे म्हणजे शेतातून बाजारात, शेता मधून गोदामात अशी माहिती भरावी.
त्यानंतर माल कोणत्या गावांमधून इतर कोणत्या ठिकाणी घेऊन जायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती भरावी. ड्रॉप-डाऊन लिस्टमध्ये सुरुवातीला राज्य त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर गाव निवडावे. वाहतुकीसाठी आपल्याला वाहतूक असलेल्या वाहनांची संख्या, संपर्क करण्यासाठी व्यक्तीचे नाव व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती नोंदवून सबमिट करावे.
शेतीचा प्रश्न आम्हाला विचारा
सबमिट केलेली माहिती ऑनलाइन सर्विस प्रोव्हायडर (वाहतूक सेवा पुरवठादार) यांच्याकडे पाठविले जाईल. आपण सबमिट केलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधा प्रमाणे वाहतूक सेवा पुरवठादार आपल्याला स्वतःहून फोन करतील. फोनवर वाहतुकीचे दर ठरवून घ्यावेत, दर ठरवताना kisan rath कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही ती जबाबदारी पूर्णपणे शेतकरी व सेवा पुरवठादार यांच्यामधील राहील.

व्यापारी

शेतकरी नोंदणी प्रमाणे व्यापाऱ्याने kisan rath मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये वैयक्तिक आणि संस्थात्मक व्यापारी असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. दोन्ही पर्यायासाठी पॅन नंबर ची माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला शेतमाल उठून पुढे न्यायचा आहे याविषयी आपली मागणी नोंदवावी. मागणी नोंदवण्याचे पद्धती शेतकरी व व्यापारी यांची साधारणपणे सारखेच आहे.

सर्विस प्रोव्हायडर (वाहतूक पुरवठादार)

वाहतूक पुरवठादाराने kisan rath मध्ये शेतकरी व व्यापारी यांच्याप्रमाणेच नोंदणी करावी. त्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वाहनांची माहिती पोस्ट करणे गरजेचे आहे. वाहनाच्या क्रमांक सहित वाहनांचा फोटो अपलोड करावा. आपण कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत वाहतूक करण्यास आहेत इच्छुक आहेत इत्यादी माहिती नोंदवावी.
शेतकरी व व्यापारी यांनी यांनी शेतीमाल वाहतुकीसाठी नोंदवलेली मागणी आपल्या kisan rath डॅशबोर्ड वरती दिसेल. आपल्याला आलेल्या रिक्वेस्ट मध्ये शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक व वाहतुक करायच्या ठिकाणांची माहिती दिसेल. आपल्याला वाहतुकीसाठी ठिकाण सोयीचे असेल तर पण शेतकर्‍याला फोन करून दर ठरवून वाहतूक करू शकता. अन्यथा आपल्याला आलेले रिक्वेस्ट डिलीट करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
kisan rath या ऑनलाइन सुविधेमुळे वाहतूक साधनांच्या अभावी अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना निश्चितच दिलासा मिळण्यास मदत होईल.
  •  
  •  
  •  
  •  

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.