•  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

mahadbt हा महाराष्ट्र शासनाचा नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यासाठीचा उपक्रम आहे. भारत सरकारने थेट लाभ हस्तांतरण हा उपक्रम 2013 मध्ये सुरू केला. या उपक्रमाद्वारे नागरिक व शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण या प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना अनुदान थेटपणे मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विकसित केलेले हे ऑनलाईन व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या मदतीने कोणत्याही अडथळ्याशिवाय थेटपणे नागरिकाच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात अनुदान जमा केले जाते.


शेतीचा प्रश्न आम्हाला विचारा

ई ठिबक प्रणाली काय आहे


direct benefit transfer या ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे वेगवेगळ्या योजनांचे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सानुग्रह अनुदान जमा केले जाते. या ऑनलाईन प्रणालीमुळे

तसेच विद्यार्थ्यांना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती (scholarship) शासनाकडून दिल्या जातात त्या सर्व शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केल्या जातात.

mahadbt

mahadbt पूर्ण विस्तारित नाव Maharashtra direct benefit transfer तीमध्ये महाराष्ट्र थेट लाभ हस्तांतरण असे आहे. mahadbt उद्देश अनुदान थेट लाभार्थ्यांच्या पर्यंत पोहोचत करणे असा होय.

mahadbt आवश्यकता का

शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वेळेत मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणे अडचणी येत होत्या. अनेकदा यामध्ये अफरातफरी झाल्याच्या तक्रारीही शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या नावाने जर एक रुपया दिला तर त्याच्या हातामध्ये फक्त दोन पैसे होतात असे आपले एक भूतपूर्व प्रधानमंत्री यांनी जाहीरपणे सांगितले होते.

याचा अर्थ असा होता नागरिकांच्या नावाने खर्च होणारा पैसा मध्ये यंत्रणेत कुठेतरी गळती होत आहे. याची जाणीव शासन पातळीवर झाली.

या सर्व पार्श्वभूमीवर मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्यरत असणारी अनुदान वितरण पद्धती किती महत्त्वाची आहे या उद्देशातून mahadbt थेट लाभ हस्तांतरण सेवा प्रणाली विकसित करण्यात आली.

वाढत्या लोकसंख्येबरोबर लाभार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरील लाभार्थ्यांना पारंपारिक पद्धतीने अनुदान वितरण करणे शासनाकडील एकशे प्रश्न होता. अशावेळी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले.

माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक सेवा नागरिकांना घरपोहोच देणे सहज शक्य हे वारंवार प्रकर्षाने जाणवले गेले. या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र शासनाने mahadbt हा उपक्रम हाती घेतला.

mahadbt सुरुवात केव्हा करण्यात आली

केंद्र सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर उपक्रम 2013 सली सुरू केलेला आहे. त्याच धर्तीवर प्रत्येक राज्याने आपापले स्वतःचे डीबीटी पोर्टल विकसित केले.

पोर्टलच्या माध्यमातून नागरिक व शेतकऱ्यांना विनासायास अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे शासनाला सहज शक्य होत आहे.

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही प्रणाली पूर्णपणे आधार संलग्न असल्यामुळे द्विरुक्ती टाळण्यासोबत कामामध्ये मोठ्याप्रमाणात अचूकता येत आहे. शिवाय एकंदरीत पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे गतिमान झाली आहे.

mahadbt

उपयोगकर्ता नोंदणी

mahadbt शासकीय योजनांचा तसेच शिष्यवृत्ती आदी घटकांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी शेतकरी नागरिकांना सर्वात प्रथम mahadbt या पोर्टल वर नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक, ईमेल आयडी व मोबाईल नंबर बंधनकारक आहे.

https://mahadbtmahait.gov.in हे महाराष्ट्र सरकारने थेट लाभ हस्तांतरण साठी केलेली वेबसाईट आहे. ही वेबसाईट मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला इंग्रजी किंवा मराठी ही भाषा आपण निवडू शकतो.

वेबसाईट वर गेल्यानंतर डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यांमध्ये new applicant registration किंवा नवीन अर्जदार नोंदणी या मेनू वर क्लिक करुन आपण नोंदणी पूर्ण करू शकता.

नोंदणी पूर्ण करण्यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे आधार क्रमांक ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. मोबाईल नंबर व ई-मेल आयडी ओटीपी व्हरिफिकेशन साठी उपयोगात आणला जातो. ओटीपी व्हेरीफिकेशन मुळे अर्जदाराची पडताळणी केली जाते.

अर्जदार माहिती

नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थी अर्जदाराने आपली वैयक्तिक माहिती पोर्टलवर भरणे बंधनकारक आहे. या माहितीमध्ये कुटुंबाची माहिती ,जमीन धारणा, क्षेत्राची माहिती, पिकांची माहिती इत्यादी माहितीचा समावेश आहे.

योजना समावेश

mahadbt पोर्टलवर सध्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या योजना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी साठी शासनाकडून असलेल्या शिष्यवृत्ती येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. काही कालावधीनंतर यामध्ये शासनाच्या सर्व योजनांचा समावेश करण्यात येणार आहे.

mahadbt, mamadbt login

योजनांची वर्गवारी महाराष्ट्र शासनाच्या खातेनिहाय करण्यात आलेली आहे. कृषी विभागाच्या योजना आपण येथे क्लिक करून थेटपणे पाहता येतील. महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या योजना सध्या येथे दर्शविण्यात आलेल्या नाहीत काही कालावधीनंतर त्या येथे उपलब्ध होतील.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपण योजना लाभ घेण्यासाठी योजनेची निवड करावी. योजनेची निवड करण्यापूर्वी पात्रता व निकष काळजीपूर्वक वाचावेत. अन्यथा मंजुरीच्या कोणत्याही टप्प्यावर आपला अर्ज रद्द करण्यात येईल.

अर्ज केलेल्या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची पूर्तता करणे लाभार्थ्याची जबाबदारी राहील. अपुर्ण कागदपत्र सहित अर्ज करू नये अन्यथा तो रद्द होण्याची शक्यता जास्त आहे.

एकाच अर्जावर सर्व योजना

महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदार श्री दादाजी भुसे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या खरीप हंगाम 2020 पासून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणावरून सर्व योजनांसाठी अर्ज करता येईल. यापूर्वी प्रत्येक योजना साठी वेगळा अर्ज करावा लागत होता त्यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ वाया जाऊन विनाकारण खर्च करावा लागत असे. या नवीन पद्धतीमुळे या सर्व बाबींना आता फाटा मिळणार आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार श्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना यापुढे योजनेसाठी कर्ज करताना सातबारा आठ इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असणार नाही. सर्व कागदपत्रे mahadbt पोर्टलवर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आधार संलग्न असल्यामुळे अर्जदाराच्या खात्याला सर्व कागदपत्रे जोडलेली असतील. खरीप हंगाम 2020 पर्यंत ही सुविधा कार्यान्वित झालेली असेल.

योजना सनियंत्रण

थेट लाभ हस्तांतरण प्रणालीमुळे योजना सनियंत्रण सोयीस्कर झाले आहे. यातील प्रत्येक टप्प्याचे ऑनलाईन मॉनिटरिंग केले जाते. लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जांना मंजुरी देणे, मंजुरी दिल्यानंतर योजनेची प्रगती पाहणे या सर्व बाबी प्रशासनाच्या दृष्टीने ही सोप्या झाल्या आहेत.

पुण्यातील प्रत्येक खात्याचे संदेश शेतकऱ्याच्या मोबाईलवर पाठविले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेविषयी अद्यावत माहिती घरबसल्या आपल्या मोबाईलवर उपलब्ध होते.

आवश्यक बाबी

१ आधार क्रमांक
२ मोबाईल नंबर
३ ई-मेल आयडी
४. पासपोर्ट फोटो
५ जमिनीबाबतचे आवश्यक कागदपत्रे
६ अर्ज करायच्या योजनेसाठी लागणारे इतर आवश्यक कागदपत्रे

mahadbt login

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तसेच अर्ज भरल्यानंतर अर्जाची मंजुरी, सद्यस्थिती इत्यादी माहिती पाहण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण पोर्टलवर लॉगीन होऊन सर्व माहिती उपलब्ध असेल. लॉगीन होण्यासाठी पोर्टलवर गेल्यानंतर डाव्या बाजूला खाली मेंबर लॉगीन बटनावर क्लिक करावे. थेट लिंक वर जाण्यासाठी mahadbt login या दुव्याचा वापर करावा.

थेट लाभ हस्तांतरण फायदे

थेट लाभ हस्तांतरण ऑनलाइन प्रणालीचे अनेक फायदे आहेत.
पुर्णतः संगणीकृत असल्यामुळे कामकाजातील गतिमानता वाढेल
मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे परिपूर्ण पारदर्शकता आहे.
कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता.
आधार संलग्न असल्यामुळे योजनेची द्विरुक्ती होणार नाही.
शेतकऱ्यांना घरबसल्या किंवा गावातच सेवा उपलब्ध होणार.

mahadbt login, mahadbt applicant login, aaple sarkar mahadbt, mahadbt portal, mahadbt scholarship 2018-19, mahadbt aaple sarkar, mahadbt gov

 •  
  199
  Shares
 • 199
 •  
 •  

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.