कृषी क्षेत्रात माझ्या डोंगराळ आदिवासी दुर्गम भागात डिजिटल माध्यमातुन मला सुद्धा app विकसित करायचं आहे मार्गदर्शन करावे ?

QuestionsCategory: मराठीकृषी क्षेत्रात माझ्या डोंगराळ आदिवासी दुर्गम भागात डिजिटल माध्यमातुन मला सुद्धा app विकसित करायचं आहे मार्गदर्शन करावे ?
Sharad D Nilkanthwar asked 2 weeks ago
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सरजी तसे तुम्ही गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फार्म बुक ॲप निर्माण केला त्याच आधारावर मला माझ्या तालुक्यातील किनवट मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करायचा आहे तरी मार्गदर्शन करावे

 •  
 •  
 •  
 •  
1 Answers
Best Answer
Pradip BhorPradip answered 2 weeks ago

शरद जी सप्रेम नमस्कार, 
आपण farmbook, सहाय्यक कृषि अधिकारी, koonbeek, शेतकऱ्यांची शेतीशाळा, शेतकरी सेवार्थ असे अनेक उपक्रम राबवत आहोत. हे सर्व आपल्या सर्वाना साठी आहे. या सर्व व्यासपीठ आपलेच आहे या व्यासपीठचा वापर आपण करू शकता आणि फक्त किनवट तालुक्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो. हे सर्व व्यासपीठ आपणास सदा सर्वदा खुले आहेत. आपण आपली वेगळी वाट निर्माण करण्यापेक्षा आपल्या वरील वाटांना महामार्गात रुपातर करण्यासाठी सिंहाचे योगदान आपण देऊ शकतो. नव्याने वाट निर्माण करणे अधिक चांगले परंतु त्यास वेळे लागतो त्या ऐवजी तयार वाटे वर चालेल्यास आपल्या ध्येयाचे अंतर कमी होते. म्हणून आपणास विंनती आहे कि, आपल्या सर्व व्यासपीठचा वापर करून आपला मार्ग सुकर करावा.
थोडक्यात काय तर एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ 
 
आपल्याला आवश्यकता असेल तर आपण आपले वेगळे अस्तित्व निमार्ण नक्कीच करू. 
आपल्या प्रत्युत्तर च्या प्रतीक्षा आहे. 

 •  
 •  
 •  
 •  

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.