फळबागेसाठी ठिबक करायचे आहे शासनाकडून किती अनुदान मिळते

Questionsफळबागेसाठी ठिबक करायचे आहे शासनाकडून किती अनुदान मिळते
Vilas raut asked 1 month ago
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
1 Answers
Rahul BedreRahul Bedre answered 1 month ago

 
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत सूक्ष्म सिंचनासाठी ८० टक्के अनुदान
राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त; तसेच नक्षलग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे उपरोक्त प्रकारच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी ८० टक्के अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय शेततळ्यात अस्तरीकरण, हरितगृह उभारणी शेडनेट या घटकांसाठी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेची अवर्षणप्रवण घोषित असलेले १४९ तालुके, अमरावती, औरंगाबाद या महसूल विभागातील सर्व जिल्हे; तसेच नागपूर विभागातील वर्धा असे १४ जिल्हे आणि केंद्र शासनाने नक्षलग्रस्त घोषित केलेल्या चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.
या नवीन योजनेसुनार आता वैयक्तिक शेततळ्यांच्या प्लॅस्टकि अस्तरीकरणासाठी खर्चाच्या ५० टक्के किंवा ७५ हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती मिळेल. ठिबक सिंचन, तुषार सिंचन संचासाठी अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान मिळेल; तर इतर शेतकऱ्यांना (पाच हेक्टर मर्यादेत) ७५ टक्के अनुदान आता मिळू शकेल. हरितगृह उभारण्यासाठी (हजार चौरस मीटर) एक लाख; तसेच अनुदान एवढ्याच क्षेत्रफळावर शेडनेट उभारणीसाठी एक लाख रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
 

 •  
 •  
 •  
 •  

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.