सोयाबीन उगवणक्षमता तपासणे

Home Forums खरीप 2020 सोयाबीन उगवणक्षमता तपासणे

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)
 • Author
  Posts
 • #452
  CHANDRAKANT KUSALKARCHANDRAKANT
  Participant
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  1. घरच्या सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणे
   सध्या शेतकरी बंधुकडे थोडा वेळ उपलब्ध आहे म्हणुन खरीपाची पूर्वतयारीचा एक भाग म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या शेतामधल्या आणि सध्या साठवुन ठेवलेल्या सोयाबीनची उगवणक्षमता तपासून घ्यावी.
   कारण आपण सर्वांना माहीत आहेच की मागील वर्षी खरीप सोयाबीन काढणी करते वेळीच आपल्या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे त्याची गुणवत्ता खालावली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आपल्याकडे उपलब्ध असलेले बियानेची उगवणक्षमता किती आहे हे आत्ताच तपासून घेणे गरजेचे आहे.* सोयाबीनचे बियाणे हे स्वपराग सिंचन करत असल्याने प्रत्येक वर्षी बियाणे बदल करण्याची आवश्यकता नसते.
   बियाणे उगवणशक्ती तपासण्यासाठी आपण गोणपाटावर एकूण 100 बिया ह्या 10×10 अशा ठेवून त्या दोन ते तीन दिवस थंड ठिकाणी आणि ओलावा राहील अशा सावलीच्या ठिकाणी ठेवा आणि तीन दिवसांनी 70 च्या वरती बिया उगवलेल्या आढळून आल्यास हे बियाणे पेरणीसाठी योग्य आहे असे समजून ते सुव्यवस्थित आणि मोठी थप्पी न लावता, भिजनार नाही अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपणास येणाऱ्या खरिपासाठी बियाणे विकत घेण्याची आवश्यकता पडणार नाही आणि पर्यायाने आपला खर्च सुद्धा कमी होईल.
  •  
  •  
  •  
  •  
  #494
  Sharad NilkanthwarSharad
  Participant

  खूप छान व थोडक्यात माहीती मिळाली 

  मी ही आपली पोस्ट सर्व माझ्या शेतकऱ्यांना पाठविला

  धन्यवाद

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)
 • You must be logged in to reply to this topic.

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.