_ सेंद्रिय शेती नव्या युगासाठी

Home Forums Organic Farming _ सेंद्रिय शेती नव्या युगासाठी

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #260
  Arvind NaleArvind Nale
  Participant
  • 18
  •  
  •  
  •  
  •  
  •  
   18
   Shares

  _*पारंपारिक कृषिविज्ञान सेंद्रिय शेती नव्या युगासाठी नवे पाऊल*_
  जीव सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात मानव हा सर्व गुणांनी परिपूर्ण आणि सोळा कलांनी दिव्य स्वरूपात होता , तेव्हा मनुष्य जीवन सुख शांती ने समृद्ध व निरोगी होते तसेच मूल्यनिष्ठा संस्कृती होती या संस्कृतीचा आधार म्हणजे शुद्ध सात्विक अन्न सुमधूर फळे सुवासिक फुलांनी व सात्विक भाजीपाला देणारी सुजलाम सुफलाम भुमाता होती
  सर्वांचे आरोग्य निरोगी व सुदृढ काया होती सुख शांतीमय असल्याने भारत हा समृद्ध शाली देश जणू सोन्याची खाणच होती सृष्टी चक्रानुसार हळूहळू मनुष्य आत्म्यासह प्रकृतीची पाच तत्वे ही सतो रजो तमो कडे झुकत गेली परिणामी आत्मा व तत्वांची शक्ती कमी कमी होत गेली.
  दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान शेती उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर सुरू झाला.सध्याच्या काळात अधिकाधिक अन्नधान्य उत्पादनाच्या हव्यासापोटी नानाविध उपाय योजले जाऊ लागले जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी अधिक अन्नधान्याची गरज भासू लागली त्यामुळे भूमीची उत्पादनक्षमता घटली सुपीक जमिनी ओसाड निर्जीव होऊ लागल्या निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संतुलन हळूहळू लागले लोभी व हिंसक वृत्तीतून पिकवलेल्या अन्न सेवनामुळे सर्वांची मनोवृत्ती हिंसक बनू लागली अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक आजार वाढीस लागले निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे दुष्काळ, महापूर, भूकंप, सुनामी इत्यादी निसर्ग प्रकोप वाढीला लागले,अनेक प्रकारचे कीड-रोग पडू लागले या सर्व मानवाच्या स्वार्थी वृत्ती व वाईट कर्मांचा परिणाम आहे आता वेळ आलेली आहे आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यास जागृत करण्याची आपले महत्त्व व आपल्या क्षमता ओळखून शेती सेंद्रिय शेतीखाली आणणे काळाची गरज बनलेली आहे त्यामध्ये कोणतेही रासायनिक खत किंवा कीटक नाशक न वापरता घरी तयार केलेल्या जैविक कीटक व रोग नाशकांचा वापर करून देशी गाई शेण गोमूत्र जैविक खताद्वारे जमीन समृद्ध बनवून आपल्याकडे असणारे पारंपारिक कृषिविज्ञान याचा वापर करून स्वतःसाठी शुद्ध सात्विक अन्नधान्य फळे व भाजीपाला पिकवावा आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बांधवांना अशा प्रकारची शेती करण्यास प्रवृत्त करावे आपल्या स्वतःच्या आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्य देखील राखण्याचे काम बळीराजा या नात्याने आपणास करावयाचे आहे आणि पुन्हा एकदा भारत देश जगामध्ये सुजलाम सुफलाम बनवून विश्वाचा गुरु बनवा चला तर नव्या युगासाठी नवे पाऊल टाकूया भारतीय पारंपारिक सेंद्रिय शेतीकडे वळू या…….
  *श्री.अरविंद नाळे ,कृषी सहाय्यक, महाराष्ट्र शासन कृषी विभाग*…

  •  
   18
   Shares

  • 18
  •  
  •  
Viewing 1 post (of 1 total)
 • You must be logged in to reply to this topic.

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.